आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Visit Sheikh Zayed Grand Mosque A Key Place Of Worship And A Masterpie

PHOTOS: ही आहे जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद, मोदींनी दिली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मशिदीत ठिकठिकाणी नक्षीकाम आहे. - Divya Marathi
मशिदीत ठिकठिकाणी नक्षीकाम आहे.
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संयुक्त अरब-अमिरात (यूएई)दौ-यावर रवाना झाले आहेत. मागील 34 वर्षानंतर यूएईला जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. याआधी 1981 मध्‍ये इंदिरा गांधी येथे गेल्‍या होत्‍या. संयुक्त अरब अमिरात येथे 26 लाख भारतीय लोक राहतात. येथील कामगारांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. युएई येथे पाेहोचल्‍यावर ते सर्वात आधी अबुधावी येथील शेख जायद मशिदीत जाणार आहेत. शेख जायद यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यूएईमधील ही मशिद अत्‍यंत संुदर आहे. अत्‍यंत भव्‍य आणि सुंदर मशिद अबुधावी येथील शेख जाएद मशिद ही जगातील मोठ्या 10 मशिदींपैकी एक आहे. ही जगातील तिसरी सर्वात मोठी मशिद आहे. पांढ-या शुभ्र रंगाची आकर्षक इमारत असलेली ही मशिद म्‍हणजे उत्‍कृष्‍ठ कलाकृतीचा नमुना आहे.
जगातील एकतेचे प्रतिक म्‍हणून या मशिदीकडे पाहिले जाते. या मशिदीच्‍या बांधकामासाठी मोरोक्को, तुर्की, भारत, मलेशिया, चीन, इराण, न्यूझीलंड, ब्रिटन आणि ग्रीस येथील कारागीर बोलवले होते. 3000 पेक्षा अधिक कामगार आणि 38 कंपन्‍यांनी या मशिदीसाठी काम केले आहे. या मशिदीच्‍या मुख्‍य हॉलसमोरील गालिचा हा देखिल जागातील सर्वात मोठा गालिचा आहे. 6000 चौरस फूट एवढा मोठा हा गालिचा असून ईराणी महिलांनी 2 वर्षे दिवस रात्र मेहनत घेऊन हा गालिचा तयार केला असे सांगण्‍यात येते. त्‍यासाठी तब्‍बल 1200 महिला राबत होत्‍या. येथे एकावेळी 9000 लोकांच्‍या बसण्‍याची व्‍यवस्‍था आहे. मशिदीत 10 मीटरचे आणि 9 टन वजनाचे झुंबरही आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, प्रसिद्ध शेख जायद मशिदीचे फोटो..