नवी दिल्ली / गुवाहाटी - पंतप्रधान
नरेंद्र मोदी शनिवारपासून चार दिवसांच्या पूर्वोत्तर राज्यांच्या दौर्यावर जाणार आहेत. 29 नोव्हेंबरला ते आसामला पोहोचतील. आसामशिवाय मणिपूर, अरुणाचलप्रदेश, त्रिपूरा आणि नागालँड येथेही जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा पूर्वोत्तर भागाचा हा पहिला दौरा आहे. याआधी एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना चार दिवस पुर्वोत्तर राज्यांच्या दौर्यावर गेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम
- 29 नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये राज्यातील पोलिस प्रमुखांच्या संमेलनाचे उदघाटन करणार. हे संमेलन मोदींच्या सांगण्यावरच प्रथमच दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्यात आले आहे.
- गुवाहाटीमधूनच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून मेघालयमधील मेंदीपथर ते आसामच्या गोलपाडा जिल्ह्यातील दुधनोई रेल्वे लाइनचे उदघाटन.
- रविवारी आसामच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधीत करतील.
- नागालँडचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव हॉर्नबिल फेस्टिव्हलचे उदघाटन.
- मणिपूरच्या संगोई उत्सवाचे उदघाटन.
- दक्षिण त्रिपूराच्या पलटनामधील 726 मेगावॅट पॉवर प्रोजेक्टच्या दुसर्या युनिटचे लोकार्पण .