आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi\'s Marital Status Court Asks Police To File Report

\'लग्न करताना मोदी अल्पवयीन नव्हते\'; कोर्टाने 3 आठवड्यात उत्तर मागितले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विवाहाचे प्रकरण आता कोर्टात गेले आहे. अहमदाबाद येथील एका न्यायालयाने मोदींच्या विवाहासंबंधीच्या एका याचिकेवर अहमदाबाद पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी मोदींनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टीच्या एका कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्यायाधीश एम.एम. शेख म्हणाले, 'या प्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल तीन आठवड्याच्या आत कोर्टासमोर सादर करावा.'
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी रनीप पोलिस स्टेशन गाठून मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांचा आरोप आहे, की 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी वैवाहिक स्थितीची माहिती लपविली होती.

पुढील स्लाइडमध्ये, मोदींच्या लग्नावरुन नगमाने डागली तोफ