आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi\'s New Ministers Are Desperately Seeking Bungalows

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुण जेटलींनी व्यंकय्या नायडू यांना कळवली पसंत, स्मृती इराणींना हवा मोठा बंगला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बंगले वाटप करण्याची तारीख जवळ येत आहे. तसे, शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू कॅबिनेटमधील सहका-यांसाठी शासकिय निवासस्थानांची यादी करण्यात व्यस्त झाले आहेत. सर्व मंत्र्यांना दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील बंगले मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यंकय्या नायडू यांची वैयक्तिक भेट घेऊन पसंती कळवली आहे. तर, प्रथमच मंत्री झालेल्या स्मृती इराणी यांनी मोठ्या बंगल्याची मागणी केली आहे.
शहर विकास मंत्रालयाच्या सुत्रानुसार, 'नवीन मंत्र्यांना लवकरच बंगल्याचे वाटप होणार आहे. त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांची पसंती कळवली आहे. मात्र, त्या आधी शहर विकास मंत्रालयाला जुन्या मंत्र्यांकडून बंगले रिकामे करुन घ्यावे लागणार आहेत.'
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, 'मोदी कॅबिनेट छोटी असल्यामुळे 40-45 बंगल्यांची गरज आहे. यूपीए काळातील मंत्र्यांना बंगले खाली करण्याची नोटीस आधीच पाठवण्यात आली आहे. बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख 26 जून असून अनेक मंत्र्यांनी त्याआधीच बंगले सोडले आहेत, तर काहींनी मुदत वाढवून मागितली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी शासकीय बंगला सोडला आहे तर, माजी दुरसंचार मंत्री कपिल सिब्बल लुटियन्स झोनमध्येच नवा बंगला शोधत आहेत.'
(छायाचित्र - शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे शासकीय निवासस्थान)