आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi's Raod Clear, Sangh Give Positive Signal To The Prime Ministership

मोदींचा मार्ग मोकळा, पंतप्रधानपदासाठी संघाचा हिरवा कंदील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिरवा कंदील दिल्यानंतर रविवारी भाजप नेत्यांना तसे कळवण्यात आले. 20 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. तत्पूर्वी मोदींच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणनीतीला अंतिम रूप देण्यासाठी संघाच्या विविध संघटनांची बैठक रविवारी सुरू झाली. सरसंघचालक मोहन भागवत बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, सोमवारी ते उपस्थित राहणार आहेत.

भाजपच्या वतीने पक्षाध्यक्ष राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यापूर्वी अशा स्वरूपाच्या बैठकीत भाजपचे फक्त ज्येष्ठ नेतेच उपस्थित राहत. संघाच्या वतीने भय्याजी जोशी, सुरेश सोनी, दत्तात्रय होसबोले आणि कृष्णगोपाल उपस्थित होते. रविवारी सकाळच्या सत्रात अडवाणी नव्हते, तर दुपारनंतर मोदी अहमदाबादला रवाना झाले.