फाइल फोटो : लाल किल्ल्यावरून मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली - देशाच 'अच्छे दिन' आणण्याचे अश्वासन देऊन सत्ता मिळवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 2 सप्टेंबर रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत. या मुहूर्तावर सरकार
आपले यश लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सरकारने आपले प्रगतीपुस्तक सादर करण्याआधी divyamarathi.com ने वाचकांच्या मतांच्या आधारावर सरकारचे प्रगतीपुस्तक तयार केले आहे. वाचकांनी महागाई, रोजगार, पाकिस्तान, भ्रष्टाचार, विकास आणि सुशासनाच्या मुद्यावर मते व्यक्त केली आहेत. या मुद्यांच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये 56.8 टक्के नागरिकांनी केंद्र सरकारला 'ए' ग्रेड दिला आहे. अर्ध्यापेक्षा अधिक वाचकांनी मोदींच्या कामाला 80ते100 टक्के दिले आहेत.
सर्व्हेक्षणात वेग वेगळ्या वेगवेगळ्या मुद्यांवर पाच विभागांमध्ये मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार 13.5 टक्के वाचकांनी 60-80% दरम्यान समाधानी असल्याचे सांगत 'बी' ग्रेड दिला तर 5.6 टक्के वाचकांनी 40-60% टक्के देत 'सी' ग्रेड दिला. त्याशिवाय 4.8 टक्के वाचकांनी 20-40 टक्केच समाधानी असल्याचे सांगत 'डी' ग्रेड दिला. 17 टक्के वाचकांना मोदी सरकारचे काम असमाधानकारक वाटले. त्यांनी 20 किंवा त्यापेक्षाही कमी टक्के देत 'ई' ग्रेड दिला. रविवार दुपारपर्यंत मिळालेल्या मतांच्या आधारे हे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे.