आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या विदेश दौऱ्यांमुळे देशाची प्रतिमा उंचावली: शशी थरूर यांच्याकडून स्तुतिसुमने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. मोदी यांच्या व्यक्तिगत ऊर्जेतून राजकीय संंबंधांना नवीन पैलू मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या विदेश दौऱ्यांमुळे देशाची प्रतिमा उंचावण्यास मदत झाल्याचे थरूर म्हणाले.
मोदी यांची स्तुती केल्यामुळे याअगोदर थरूर यांना काँग्रेसच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. त्या वेळी त्यांना प्रवक्तेपद गमवावे लागले होते; परंतु त्यानंतरही थरूर मोदी यांची वेळोवेळी स्तुती करत आले आहेत. शुक्रवारी सी. राजामोहन यांचे पुस्तक ‘मोदीज वर्ल्ड, एक्स्पेंडिंग इंडियाज स्फेअर ऑफ इन्फ्लुअन्स’ विमोचनप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधानांनी एका वर्षात २४ देशांचा दाैरा केला आहे. त्यादरम्यान त्यांनी सकारात्मक छाप टाकली आहे; परंतु मोदी सरकार यूपीए सरकारच्या धोरणांनाच पुढे नेत आहे. परराष्ट्र धोरणात काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासारख्या कार्यक्रमातून जगभरात योगाला आेळख देण्याचे मोठे काम केले आहे, असे थरूर म्हणाले. मोदींनी शपथविधीनंतर काही दिवसांतच नेपाळ, भूतानचा दौरा केला होता.
बातम्या आणखी आहेत...