आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohammad Shafi Armar, Chief Recruiter For Islamic State In India

USच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला ISIS चा रिक्रूटर, भारतात FB वरुन सुरु होती भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 वर्षांचा शफी भारतात आयएससाठी रिक्रूटमेंट करत होता. सोशल मीडियावरुन घेतलेला फोटो. - Divya Marathi
26 वर्षांचा शफी भारतात आयएससाठी रिक्रूटमेंट करत होता. सोशल मीडियावरुन घेतलेला फोटो.
नवी दिल्ली - इस्लामिक स्टेटसाठी (आयएस) भारतातून दहशतवाद्यांची भरती करणारा मोहम्मद शफी अरमर मारला गेल्याची माहिती आहे. तो सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेला. या बातमीने भारताला मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे, कारण शफी आयएससाठी भारतीयांची भरती करत होता. त्याने आयएसच्या फौजेत 30 दहशतवाद जोडले होते आणि 700 हून अधिक त्याच्या संपर्कात होते.

कोण होता शफी
- शफी कर्नाटकातील भटकळ येथील रहिवासी होता.
- तो भारतातील तरुणांना हेरुन त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेत होता. 30 जणांची भरती केल्याचा त्याच्यावर आरोप होता.
- तो फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करत होता आणि मग त्यांना सीरिया किंवा इराकमधील दहशतवादी कार्यात सहभागी करुन घेत होता.
-26 वर्षांच्या शफीने आतापर्यंत ज्यांची आयएसमध्ये भरती केली होती, त्यापैकी 23 भारतीयांना यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.
- शफीचा मोठा भाऊही सीरियात होता, तो याआधी अशाच हल्ल्यात मारला गेला होता.
पुढील स्लाइडमध्ये, शफीचा भाऊही होता सीरियात...