आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा मार्ग खडतर; उद्दिष्टे ठाम, त्यांच्या रुपाने देशाला मिळाला नवा ठेकेदार : मोहन भागवत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींना सर्वांच्या कल्याणाची व्यवस्था करणारा ठेकेदार असे म्हटले आहे. - Divya Marathi
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींना सर्वांच्या कल्याणाची व्यवस्था करणारा ठेकेदार असे म्हटले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग भलेही खाचखळग्यांनी भरलेला असेल. पण ते उद्दिष्टांवर ठाम आहेत. यासाठी ते भक्तिभावाने आपले कर्म पार पाडत आहेत. त्यांच्या लेखी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, पण त्यांच्याकडून  देशाला खूप अपेक्षा आहेत, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी मांडले.
 
मावळणकर हॉलमध्ये मोदी यांच्या जीवनावर लिहिलेल्या “द मेकिंग ऑफ ए लेजंड’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तकाचे लेखक सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वरी पाठक आहेत.
 
यावेळी बोलताना भागवत म्हणाले, कोणत्याही व्यक्तीत दोन व्यक्तीत्व असतात. एक दिसणारे,दुसरे काम करणारे. मोदी भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी काम करत आहेत. भारत एक हजार किंवा २ हजार वर्षांपूर्वी जसा होता, त्यापेक्षाही देशाची चांगली स्थिती करण्याची मोदींची इच्छा आहे.त्यासाठी  त्यांनी २०२४ चे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु याहीपेक्षा जास्त कालावधी लागेल, असे मोदींना वाटते. कारण बरेच काम जनतेलाच करावे लागणार आहे. प्रत्येक काम केवळ नेत्याच्या भरवशावर सोडता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...