आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Bhagwat Said Making Ram Mandir Is Real Tribute To Ashok Singhal

सरसंघचालक म्हणाले, राम मंदिर हीच सिंघल यांना खरी श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषद (विहिंप) चे प्रमुख अशोक सिंघल यांच्या शोकसभेदरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भागवत म्हणाले की, राम मंदिर तयार करणे हीच सिंघल यांनी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सिंघल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. 17 नोव्हेंबरला गुडगावच्या एका हॉस्पिटलमध्ये सिंघल यांचे निधन झाले होते. सिंघल दीर्घकाळापासून राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

आणखी काय म्हणाले भागवत...
> रविवारी रात्री दिल्लीत झालेल्या शोकसबेत भागवत म्हणाले की, सिंघल यांच्या केवळ दोन इच्छा होत्या. एक म्हणजे अयोध्येमध्ये राममंदिर तयार करणे आणि दुसरी म्हणजे वेदांचा प्रचार प्रसार करणे.
> ते म्हणाले, राम मंदिर तयार करण्यासाठी आपण गांभीर्याने प्रयत्न करायला हवे. त्यासाठी अशोक सिंघल यांची जिद्द आपल्याला मदत करेल.
> ते म्हणाले, आगामी काळात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल यादिशेने पावले उचलली जातील अशी आशा आहे.
> देल्या महिन्यात सिंघल यांच्या वाढदिवसाच्या वेळीदेखिल आरएसएसप्रमुख आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला होता.

अमित शाह यांचीही उपस्थिती...
> भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही शोक सभेत उपस्थिती होती. ते म्हणाले स्वतंत्र भारतामध्ये राम जन्मभूमी आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते.
> त्या आंदोलनाचे सर्वेसर्वा सिंघल होते, असेही शहा म्हणाले.
> शहा आणि भागवत यांच्याबरोबरच शोक सभेत रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्यंकय्या नायडू, साध्वीनिरंजन ज्योती यांचीही उपस्थिती होती.

राम मंदिर आंदोलन...
राम मंदिराचा मुद्दा 1989 नंतर चांगलाच पेटला होता. त्यावेळी या मुद्द्यामुले देशात धार्मिक तणावही पसरला होता. देशाच्या राजधानीवरही वारंवार त्याचा परिणाम जाणवत होता. हिंदु संघटनांच्या दाव्यानुसार अयोध्येत श्री रामांच्या जन्मस्थळी मशीद बनवण्यात आली होती. मंदिर तोडून ही मशीद बनवण्यात आली होती. राम मंदिर आंदोलनादरम्यान सहा डिसेंबर 1992 ला बाबरीमध्ये वादग्रस्त इमारत पाडण्यात आली. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.