आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moin Qureshi To Sunanda Thanks All Under Control Now

मांस निर्यातदार मोइन कुरैशीने सुनंदाला म्हटले होते, \'डार्लिंग, आता सर्व नियंत्रणात आहे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे होते आहेत . ताज्या माहितीनुसार मांस निर्यातदार मोइन कुरैशीसोबत सुनंदा पुष्करची ओळख होती. या दोघांमध्ये 2013 मध्ये ब्लॅकबेरी मोबाइलवरुन मॅसेजच्या माध्यमातून बोलणे होत होते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बुधवारी चार जणांची चौकशी केली. त्यात काँग्रेस खासदार आणि सुनंदाचे पती शशी थरुर, सुनंदाचे मित्र संजय दीवान यांचा समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, राकेशने सुनंदाला अलप्रेक्स टॅब्ल्टे्स आणून दिल्या होत्या.
सुनंदाना 17 मार्च 2013 रोजी बीबीएम (ब्लॅकबेरी मॅसेंजर)वर कुरैशीला विचारले होते, 'तुझी कंपनी व्यवस्थित सुरु आहे ना? मी तुला मिस करते. बुधवारी आमच्या 97, लोधीरोड येथील घरी डिनरला ये. तू आला तर मला, शशी आणि नवीनला आनंद होईल.' याच्या उत्तरात कुरैशीने लिहिले होते, 'आता सर्व नियंत्रणात आहे, डार्लिंग. मी 20 तारखेला लाहोरमध्ये आहे. परत आल्यानंतर भेटतो. डिनरला बोलावल्याबद्दल धन्यवाद. लव्ह मोइन.'
यानंतरच्या दुसर्‍या एका मॅसेजमध्ये कुरैशीने सुनंदाला डिनरसाठी निमंत्रित केले होते. कुरैशीने 21 ऑगस्ट 2013 रोजी सुनंदाला 40, ए के ड्राइव्ह डीएलएफ, छतरपूर फार्म हाऊस येथे रात्री नऊ वाजता डिनरसाठी बोलावले होते. त्याच्या उत्तरात सुनंदाने लिहिले होते, 'यस, डार्लिंग. नक्की भेटते.'
कुरैशी सध्या आयकर विभागाच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले आहे. माजी सीबीआय प्रमुख रंजीत सिन्हाच्या घरी असलेल्या व्हिजिटींग डायरीमध्ये त्यांचे नाव 90 हून अधिकवेळा आल्यानेही ते चर्चेत होते.
सुनंदा आणि मोईन कुरैशी यांची ओळख कशी झाली, ते एकमेकांना केव्हापासून ओळखत होते. त्यांच्यात मैत्री होती की इतर काही संबंध होते याचा दिल्ली पोलिसांची एसआयटी तपास करीत आहे. कुरैशीला सुनंदाने डीनरसाठी निमंत्रीत केले होते, अशी माहिती एसआयटीला मिळाली आहे.
बुधवारी थरुर आणि दीवान यांच्यासह चार जणांची चौकशी करण्यात आली. इतर दोघे बडे उद्योगपती होते, मात्र त्यांची नावे समोर आलेली नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, शशी थऱुर यांनी त्यांच्या खासगी स्टाफला मारहाण केल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर एसआयटीने त्या लोकांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून समोर आलेल्या सत्याचे उत्तर थरुर याना द्यावे लागणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, वाचा कोण आहेत मोइन कुरैशी...