आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीच्या विरोधातील देशव्यापी बंद पूर्णपणे फसला : व्यंकय्या नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या विरोधातील देशव्यापी बंद पूर्णपणे फसला आहे. विरोधकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला सामान्य नागरिकांनी मुळीच पाठिंबा दर्शवला नाही, अशी टीका माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे.
‘जन आक्रोश’ रॅली फ्लॉप ठरली आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांशिवाय या आंदोलनात कोणीही सहभागी झालेले नव्हते. माकपचे नेते विमल बासू यांनी बंद पुकारणे चूक झाली. त्यासाठी पुरेशी तयार करता आली नसल्याची कबुली दिल्याचे नायडू म्हणाले. ते मंगळवारी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. खरे तर लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर खुश आहेत. त्यांचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. काही अडचणी जरूर आहेत; परंतु जनतेने त्या मोठ्या मनाने स्वीकारल्या आहेत. जनतेला देशहिताचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच त्यांनी निर्णयाला पाठिंबा दिला आहे. विरोधकांमुळे संसदेतील कामकाज नीटपणे होत नाही. आम्ही पंतप्रधान येऊन बोलतील, असे म्हणालो. परंतु अर्थविषयक प्रश्नावर अर्थमंत्री बोलण्यात गैर काय? मला तर विरोधी पक्षाचा उद्देश काय हेच कळेनासे झाले आहे. त्यांना अडचण तरी काय आहे? संसदेचे कामकाज सुरळीतपणे का चालू दिले जात नाही, असा प्रश्न नायडू यांनी केला. १० डिसेंबर २००९ रोजी लिबरहान आयोगाच्या अहवालावर तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत निवेदन केले होते. ही गोष्ट विरोध विसरले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. चर्चेसाठी आम्ही तयार आहोत; परंतु ते गोंधळ घालून चर्चाही घडवून आणू देत नाहीत, असे नायडू यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...