आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Demanding Virous, File Locking Unlock And Asking Money

खंडणी मागणारा व्हायरस,फाइल लॉक करून अनलॉक करण्यासाठी पैशांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या सायबर स्पेसमध्ये खंडणी मागणारा व्हायरस सक्रिय झाला आहे. हा व्हायरस संगणक वापरकर्त्याचे महत्त्वाचे दस्तऐवज लपूनछपून लॉक (एनक्रिप्ट) करतो आणि मग ते दस्तऐवज अनलॉक करण्यासाठी खंडणीची मागणी करतो. सायबर सुरक्षा अधिका-यांनी या व्हायरसपासून सतर्क राहण्याचा इशारा इंटरनेट वापरकर्त्यांना दिला आहे.
क्रिप्टोलॉकर नावाच्या या व्हायरसची गणना ‘गंभीर धोकादायक’ या गटात करण्यात आली आहे. जो संगणक वापरकर्ता या व्हायरसच्या कचाट्यात सापडतो त्याच्याकडून तो फाइल्स अनलॉक करण्यासाठी 300 डॉलरपर्यंतची (सुमारे 18,700 रुपये) खंडणी मागतो. ‘अज्ञात प्रीपेड नगदी व्हाउचर’च्या माध्यमातून खंडणीची ही रक्कम मागण्यात येते. हा व्हायरस लोकल ड्राइव्हबरोबरच शेअर्ड नेटवर्क ड्राइव्हज, यूएसबी ड्राइव्हज, एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हज, नेटवर्क फाइल शेअर्स आणि एवढेच नव्हे तर क्लाउड स्टोअरेज ड्राइव्हजमध्ये असलेल्या फाइल्सवरही हल्ला चढवून खंडणीची मागणी करू शकतो. एकदा वापरकर्त्याचा ई-मेल किंवा ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घुसखोरी केल्यानंतर हा व्हायरस वापरकर्त्याची सर्वच गोपनीय माहिती धोक्यात आणतो.