आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीआयसीआयचे 18 कर्मचारी निलंबित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काळा पैसा पांढरा करण्याच्या गोरखधंद्यांत तीन बँका गुंतल्याचा दावा ‘कोब्रापोस्ट’ पोर्टलने केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने 18 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. या आरोपांची सखोल अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

सर्वांत मोठी खासगी बँक असलेली ही बँक काळा पैसा पांढरा करू पाहत असल्याचे स्टिंग ऑपरेशननंतर म्हटले होते. याची व्हिडीओ क्लिपिंगही वेबसाइटने गुरुवारी प्रसिद्ध केली. यात काही अधिकारी बेनामी संपत्ती स्वीकारून ती बँकेच्या विविध योजना आणि बेनामी खात्यांत जमा करण्याचे मान्य करत असल्याचे दिसते.