आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून ठरल्यावेळीच, एक जूनला केरळात! ‘हवामान’चे भाकीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदा मान्सून वेळेवर म्हणजेच एक जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. पावसाने आपला "नेम' कायम ठेवला तर तो ७ जूनला महाराष्ट्रातही पोहोचू शकतो. तथापि, हवामान खात्याने यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आपत्कालीन योजना आखत असून जास्तीत जास्त शेतक-यांना पीक विमा योजनेचा फायदा मिळवून देण्याचा विचार करत आहे.

सरासरीपेक्षा ७% कमी
हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, मान्सूनचे आगमन सामान्य दिसत आहे. त्यात दोन-तीन दिवसांचा किरकोळ उशीरही होऊ शकतो. आतापर्यंत मान्सूनच्या वाटचालीत विलंब झालेला नाही. अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख व वाटचालीची अधिकृत घोषणा १५ मे रोजी केली जाईल. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या आपल्या पहिल्या अंदाजात यंदा सरासरीच्या ९३ टक्केच पावसाचे भाकीत केले होते.

५८० जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन योजना
कृषी सचिव सिराज हुसेन म्हणाले, ५८० जिल्ह्यांत आपत्कालीन योजना कार्यान्वित करण्याची पूर्ण तयारी करण्याचे निर्देश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांत स्थानिक गरजांनुसार आपत्कालीन योजनांचे अद्ययावतीकरण होत आहे.

४५ दिवसांत पीक विम्याचा क्लेम
शेतक-यांत पीक विमा योजना लोकप्रिय करण्यासाठी सरकार मोठी पावले उचलत आहे. कृषी कर्ज घेतलेल्या शेतक-यांना पीक विम्याचे कवच दिले जाणार आहे. ४५ दिवसांतच त्यांचे दावे निकाली काढले जातील.

कालावधी : ७० टक्के पाऊस हा जून-सप्टेंबर कालावधीत पडतो. २०१४-१५ या कृषी वर्षात भारताचे अन्नधान्य उत्पादन ३ टक्क्यांनी घटून २५.७० कोटी टनांपर्यंत घसरले होते.

सरासरी पावसाचे ठोकताळे
>88% पाऊस गेल्या वर्षी
>12% सरासरीच्या कमी
>93% पावसाचा अंदाज यंदा
>05% गतवर्षीपेक्षा जास्त
पहिला अंदाज; काळजीचे कारण
28% सरासरीइतक्या पावसाची शक्यता
68% सरासरीपेक्षा कमी पाऊस शक्य.
01% सरासरीहून जास्त पावसाची शक्यता
*आयएमडी अंदाजानुसार

सरासरी पाऊस : स्कायमेट
स्कायमेट या खासगी संस्थेचे सीईओ जतीन सिंह म्हणाले की, आम्ही सरासरी पावसाचे भाकीत करत आहोत. दक्षिण-पश्चिम मान्सून १ जून वा त्याच्या २-३ दिवसांनी दाखल होऊ शकतो.