आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरीपेक्षा ११% कमी पाऊस; मराठवाड्यात ३६, विदर्भात १० टक्के कमी पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. या वेळी मान्सून अपेक्षेपेक्षा थोडा कमी बरसला आहे. हवामान खात्याने नऊ जून रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार देशभरात यंदा सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस होऊ शकतो, असे म्हटले होते; परंतु १५ सप्टेंबरपर्यंत देशात एकूण वार्षिक सरासरीच्या ११ टक्के कमी पाऊस झाला आहे.
विविध राज्यांत तसेच भागात सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस नोंदवला गेला आहे, तर २८ टक्के भागांत अद्यापही कमी पाऊस नोंदवला गेला आहे. देशभरात पावसाळ्यात ८०७.४ मिलिमीटर पाऊस होणे हे सर्वसाधारण मान्सूनचे लक्षण समजले जाते; परंतु अद्याप ७१९. ३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे. देशात सर्वाधिक पाऊस कर्नाटक उपविभागात झाला आहे. या क्षेत्रात सरासरीपेक्षा २० टक्के जास्तीचा पाऊस झाला. जम्मू-काश्मीरमध्येही नुकताच प्रचंड पाऊस झाला. या पावसाच्या आधी काश्मीरमध्ये दुष्काळाची छाया होती; परंतु त्यानंतर पाऊस सरासरीच्या तुलनेत जम्मू- काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. येथे सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मराठवाड्यासह हरियाणा, चंदिगड, दलि्ली, पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश आदी भागांत सरासरीपेक्षा खूपच कमी म्हणजे ५४ ते ३६ टक्के कमी पाऊस पडल्याने त्याचा शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. पैकी मराठवाड्यासह अनेक भागांत उशिराने पाऊस सुरू झाला. त्याचाही एकूण सरासरीवर परिणाम झाला आहे.

या भागांत झाला कमी पाऊस (टक्केवारीमध्ये)
हरियाणा, चंदिगड व दिल्ली५४
पश्चिम उत्तर प्रदेश५३
पंजाब४७
पूर्व उत्तर प्रदेश४०
मराठवाडा३६
हिमाचल प्रदेश३४
तेलंगण३२
उत्तर - पूर्व राज्य३०
पूर्व मध्य प्रदेश२५
बिहार१८
झारखंड१३
विदर्भ१०
गुजरात९
पश्चिम मध्य प्रदेश७
छत्तीसगड४