आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: मान्‍सून केरळमध्‍ये दाखल, लवकरच महाराष्‍ट्रातही होणार आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दुष्‍काळाने होरपळलेल्‍या जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे. मोसमी पाऊस केरळमध्‍ये दाखल झाला असून लवकरच कोकण, गोव्‍यासह कर्नाटकलाही मान्‍सून व्‍यापण्‍याची चिन्‍हे आहेत. भारतीय हवामान खात्‍याने यासंदर्भात आज अधिकृतरित्‍या घोषणा केली. मान्‍सूनचे महाराष्‍ट्रात लवकरच आगमन होण्‍याची चिन्‍हे आहेत. राज्‍यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भासह कोकण आणि दक्षिण महाराष्‍ट्रात पावसाने मान्‍सूनच्‍या आगमनाचे संकेत दिले. मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.

हवामान खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, आज मान्‍सून केरळमध्‍ये दाखल झाला. मोसमी पाऊस दाखल झाल्‍याची काही विशिष्‍ठ निकष पूर्ण झाले आहेत. बंगालच्‍या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून अरबी समुद्रातही मोसमी पावसाच्‍या हालचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्‍यामुळे येत्‍या 48 तासांमध्‍ये मान्‍सून कर्नाटक आणि गोव्‍यासह कोकणाचा काही भाग व्‍यापण्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे.

हवामान खात्‍याने 3 जूनला मान्‍सून केरळमध्‍ये दाखल होईल, असा अंदाज व्‍यक्त केला होता. याच अंदाजावर हवामान खाते काही दिवसांपूर्वी ठाम होते. परंतु, जूनच्‍या पहिल्‍याच दिवशी मान्‍सूनची घोषणा करण्‍यात आली. मान्‍सून महाराष्‍ट्रातही दोन ते तीन दिवस मान्‍सून लवकर दाखल होण्‍याचा अंदाज आहे.