आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा पाऊस 6% कमी, आणखी 10 दिवस पावसाचे, मध्य भारतात पाऊस शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात यंदा मान्सूनच्या पावसात ६ टक्क्यांनी घट झाली आहे. सामान्यपणे १५ सप्टेंबरला मान्सून अलविदा करतो. परंतु यंदा आणखी दहा दिवस पाऊस मुक्कामी असल्याचे भाकीत हवामान विभागाने केले आहे.  

देशाच्या दक्षिणेकडील काही भागात आतापर्यंत कमी पावसाची नोंद झाली होती. आता मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने तेथील परिस्थितीत सुधारण दिसून येईल. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मध्य भारतात सरी कोसळू लागतील. नैर्ऋत्येकडील भागात मात्र जास्त पाऊस होणार नाही. दहा दिवसांनंतर वातावरणात बदल झाल्यास मान्सूनच्या परतीबद्दल काही सांगता येऊ शकेल. छत्तीसगडमध्ये १८ सप्टेंबर, बिहार व झारखंडमध्ये १९ सप्टेंबरपासून पाऊस आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
पीक नुकसानीचे भरपाई मिळणार  
पीक उत्पादन जास्त असलेल्या राज्यांपैकी उत्तर प्रदेशात ३२ टक्के हरियाणात २९ टक्के तर मध्य प्रदेशात २५ टक्के पाऊस कमी झाला. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे प्रमुख कृषी संशोधक डॉ. जे.पी.एस डबास म्हणाले, मान्सून दुसऱ्यांदा सक्रिय होणे ही कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी ठरते. मध्य भारतात सरासरीहून जास्त पाऊस झाल्यास त्या राज्यांत नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशात कमी पावसामुळे झालेल्या हानीचे मूल्यमापन करणे काहीशी घाईचे ठरेल, असे डबास यांनी सांगितले.   
 
सरासरीपेक्षा कमी पाऊस
मणिपूर-४२ टक्के, दिल्ली-३६ टक्के, उत्तर प्रदेश- ३२ टक्के, हरियाणा- २९ टक्के, नागालँड २६ टक्के, मध्य प्रदेश- २५ टक्के, पंजाब- १८ टक्के, गोवा- २२ टक्के  
बातम्या आणखी आहेत...