आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यावर झाली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. (फाईल) - Divya Marathi
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. (फाईल)
नवी दिल्ली - मानसून सेशन सुरू होण्यापूर्वी रविवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. याचवेळी रविवारी एनडीए घटकपक्षांची सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये उपराष्ट्रपति पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होणार अशी शक्यता आहे. येत्या 17 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी विरोधकांनी आपली वेगळी रणनीती आखली आहे. 
 
 
विरोधकांची वेगळी व्यूहरचना
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ठळक मुद्यांवर संसदेत सरकारला घेरण्यासाठी विरोधक आपली व्यूहरचना तयार करत आहेत.  यासाठी 18 पक्ष चर्चा करत आहेत. 
- या 5 मुद्यांमध्ये नोटबंदीचा लोकांवर झालेला वाईट परिणाम, जीएसटी लागू करण्यात सरकारची घाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राजकीय षडयंत्र, देशाच्या संघराज्य पद्धतीचे संरक्षण इत्यांदींचा समावेश आहे.