आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिवेशनाला गदरोळाने सलामी, राज्‍यसभा दुपारपर्यंत स्‍थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. पहिल्‍याच दिवशी पहिल्‍याच सत्रात गदारोळामुळे राज्‍यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्‍थगित करण्‍यात आले. त्‍यामुळे हे अधिवेशनही वादळी ठरणार आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विरोधी पक्षांना संयम राखून संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्‍याचे आवाहन केले आहे. गेल्‍या दोन अधिवेशनांमध्‍ये बराच वेळ वाया गेला आहे. त्‍यामुळे या अधिवेशनात तसे होऊ नये, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्‍यक्त केली.

अधिवेशनामध्ये मांडल्या जाणार्‍या विधेयकांमध्ये 32 प्रलंबित आणि नवीन 25 विधेयकांचा समावेश असणार आहे. अन्न सुरक्षा विधेयकासंदर्भातील चर्चेवरही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सरकार हे विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांनी तशी शक्‍यता नसल्‍याचे यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे. बहुतांश पक्षांनी यासाठी सर्मथन देणार असल्याचे सांगितले आहे, परंतु भाजप आणि इतर डाव्या पक्षांनी काही बदल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्‍यामुळे या विधेयकाबाबत संभ्रम आहे.

अधिवेशनामध्ये बिहारची मध्यान्ह भोजन दुर्घटना, इशरत जहाँ प्रकरण, महागाई, उत्तराखंडमधील जलसंकट यासह चीनची घुसखोरी या महत्त्वाच्या मुद्दय़ांसह सुमारे 50 विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे. अधिवेशनाच्‍या पहिल्‍याच दिवशी खासदार सचिन तेंडुलकरची राज्‍यसभेत उपस्थिती राहिली.