आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP-UP मध्ये पाऊसामुळे वातावरणात गारवा, 2-3 दिवसांमध्ये मान्सून उत्तर भारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओडिशामध्ये पूर्व मोसमी पाऊस. 2-3 दिवसांत मान्सूनचे आगमन. - Divya Marathi
ओडिशामध्ये पूर्व मोसमी पाऊस. 2-3 दिवसांत मान्सूनचे आगमन.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अडकलेला मान्सून हळु-हळु पुढे सरकत आहे. शुक्रवारी मध्यप्रदेश-उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला हा मान्सूनपूर्व पाऊस होता. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दिल्लीत 15 जुलैनंतर पावसाला सुरुवात होईल. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकतोय मान्सून
- शुक्रवारी मुंबई, भोपाळ, उत्तर प्रदेशसह ओडिशाच्या अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.
- रविवारी रात्री मराठवाड्यातील औरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस झाला. शिवाय शहराचे दिवसाचे तापमान 39 वरुन 29 अंशावर आले.
- येत्या 24 तासांमध्ये छत्तीसगडच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
- काही भागांमध्ये हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. मुंबईत 22 जून पर्यंत मान्सून पोहोचणार आहे.
- मान्सून अद्याप त्याच्या आपेक्षित आगमनापेक्षा 7-8 दिवस मागे आहे.
- मान्सूनचे शनिवारी महाराष्ट्रात विदर्भमार्गे आगमन झाले. आता संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला. दक्षिण कोकण व्यापून अरबी समुद्रातून पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

राजस्थानमध्येही पाऊस
- राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता.
- अलवरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.
- जयपूर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...