आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 हून अधिक सीईओंचा भाजपमध्ये प्रवेश, अमित शाह म्हणाले हे एक कुटुंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉर्पोरेट जगतातील सुमारे 100 हून अधिक प्रमुखांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, लुफ्थांसाचे परवेज आलमगीर खान, कतार एअरलाइन्सचे भारताचे प्रमुख हेनरी मोसेस, एटीअँडटीच्या नीता अग्रवाल, आइकॉन ग्रुपचे जगप्रीत लांबा यांचा या सीईओंमध्ये समावेश आहे.

त्यांच्याशिवाय कॉर्पोरेट अलायन्स ग्रुपचे कपिल कुमारिया, इंटर-ग्लोब टेक्नॉलॉजीचे अनिल पराशर, फोर्टिस रुग्णालयाचे ज्येष्ट अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नवीन तलवार, ज्यष्ठ वकील राजीव त्यागी आणि इंडिया अब्रॉड न्यूज पेपर (रेडिफ डॉट कॉम) यूएसए/कॅनडाचे सीईओ राजीव भांबरी यांचाही भाजपाचे सदस्यत्व घेणार्‍यांमध्ये समावेश आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, कॉरपोरेट क्षेत्रातील हे सर्व चेहरे आज पक्षात नव्हे तर एक कुटुंबात सहभागी झाले आहेत.