आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्णतेच्या लाटेने घेतला दोन हजारांवर बळी, डॉक्टरांच्या सुट्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- सर्वाधिक १३०० वर मृत्यू आंध्र प्रदेश आणि तेलंगानात
- उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र व ओडिशात पारा 46 ते 48 अंशावर


नवी दिल्ली - देशभरात उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचा मृत्यू झाला असून यातील १३०० हून अिधक लोक एकट्या आंध्र प्रदेश व तेलंगणात मृत्युमुखी पडले आहेत. देशात अनेक राज्यांत पारा ४७ अंशावर असून अनेक राज्यांत सरासरी तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिएसपर्यंत पोहचले आहे. बुधवारपर्यंत आंध्र प्रदेशात १०२० व तेलंगणात ३४० लोकांचा उष्माघातानेमृत्यू झाला. केंद्र सरकारही उष्णतेच्या या लाटेने तत्पर झाले असून डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कुठे, किती जणांचा मृत्यू
ओडिशा ६६
झारखंड 22
प. बंगाल 14
राजस्थान 06

बहुतेक मृत्यू अतिनील किरणांमुळे
जागतिक हवामानविषयक संस्थेनुसार भारतात उष्माघाताने होत असलेले मृत्यू अिधक काळ उष्ण व कोरड्या हवेत फिरल्यानेच झाले आहेत. याशिवाय अतिनील किरणांचा मारा हे पण प्रमुख कारण आहे. या किरणाची पातळी साधारणपणे ० ते ७ असते. मात्र, आंध्र, तेलंगणा व ओडिशात यंदा ती १२ वर पोहचली आहे. यामुळे उष्माघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशा किरणांच्या माऱ्यात एखादी व्यक्ती अर्धा तास राहिली तरी मृत्यू संभवतो.

अजून चार दिवस लाट कायम राहील असा हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी किमान चार दिवस देशभरात उष्णतेची लाट कायम राहणार असून काही भागांत मान्सूनपूर्व पावसामुळे पावसाचे ढग खेचून आणणारे दबावाचे क्षेत्र बंगालमधून उत्तर-पूर्वेकडील राज्यांच्या दिशेने सरकले आहे.

पाकही जबाबदार!
पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या पश्चिमी उष्ण वाऱ्यांमुळे भारतात उष्मा वाढला आहे. हे वारे सिंध भागातून वाहत असून तेथे पाऱ्याने ४९ ते ५० अंशाची पातळी गाठली आहे.

वाटचाल मान्सूनची
{सध्या मान्सून श्रीलंका व म्यान्मारच्या दक्षिण भागांत आहे.
{मान्सूनपूर्व पाऊस यंदा ५० टक्क्यांहून अधिक झाला.
{तरी मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव. यामुळे समुद्राच्या तापमानात बदल झाला असून यामुळे ढगांची वाटचाल खोळंबली आहे.
{येत्या काही दिवसांत हवामान बदलेल व मान्सून वेळेवर दाखल होईल, अशी अपेक्षा. पाऊसही समाधानकारक होईल असा अंदाज.

सहा दिवसांत पावसाचा दिलासा
मान्सून आठवडाभरात केरळमध्ये दाखल होईल. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा वेधशाळेचा अंदाज.
बातम्या आणखी आहेत...