आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 3 Lakhlocalities Not Getting Pure Drinking Water

देशातील ३ लाख ग्रामीण वस्त्यांत पाण्याचे दुर्भिक्ष; पुरेसे नाहीच, मिळते तेही दूषित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील ३.१४ लाख ग्रामीण वस्त्यांवर आजही पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही. विशेष म्हणजे जे काही पाणी मिळते त्यातही दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण प्रचंड आहे. दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या सुमारे ६६ हजार वस्त्या देशभरात असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले.

केंद्रीय मंत्री बिरेंदरसिंह यांनी ही माहिती देताना सांगितले की, एकूण ६६ हजार ०९३ वस्त्यांवर पुरवले जाणारी पाणी किंवा उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत दूषित असून यात रसायनिक द्रव्य व क्षारांचा समावेश असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा अपाय होण्याचा धोका आहे. असे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वस्त्यांची क्रमवारी तयार करून उपाययोजना करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. सध्या देशात ग्रामीण भागांत १६ लाख ९६ हजार ग्रामीण वस्त्या असून यातील १३ लाख १६ हजार वस्त्यांना रोज दरडोई किमान ४० लिटर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. २००९-१०मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून स्वच्छ पाणीपुरवठा होत असलेल्या ग्रामीण वस्त्यांची संख्या वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशात प्रमाणापेक्षाही कमी पुरवठा
- देशातील ग्रामीण भागात रोज दरडोई किमान ४० लिटर पाणीपुरवठा व्हावा, असे प्रमाण ठरवून दिले आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
- २० एप्रिल रोजी प्रसिद्ध आकडेवारीनुसार ३ लाख १४ हजार ५२९ वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

पाणीपातळीचे काय?
ग्रामीण भागात उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे काय, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. याची माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सिंह यांनी सांगितले. जलस्रोतांबाबत सरकार गंभीर असून यासाठी नदीप्रणाली विकास व गंगा स्वच्छता अभियानासारख्या योजना सरकारने हाती घेतल्या असल्याची माहिती सिंह यांनी दिली.