आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ बंद, आता ५०० औषधांवर बंदीची टांगती तलवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने मागील आठवड्यात ३४४ निश्चित मात्रा संयोजन औषधांच्या (पॅरासिटामॉल + फिनाइलफ्रिन + कॅफिन) उत्पादन, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तशी अधिसूचनाही जारी केली होती. त्यानंतर कंपन्यांनी या औषधांचे उत्पादन बंद करायला सुरुवात केली आहे. आमचे उत्पादन ‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ अधिसूचनेच्या कक्षेत येत असल्यामुळे त्याचे उत्पादन, वितरण व विक्री बंद केल्याचे मंगळवारी प्रॉक्टर अँड गॅम्बलने (पी अँड जी) जाहीर केले आहे. अधिसूचनेत सुमारे ५०० औषधांवर बंदीची तलवार आहे.

बंदीच्या यादीत प्रतिजैविके आणि मधुमेहरोधक औषधेही आहेत. ही औषधे अप्रासंगिक, असुरक्षित व अप्रभावी असल्याने बेकायदा घोषित केली जाऊ शकतात. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने फायझरनंतर अबॉट हेल्थकेअर व मॅक्लॉड्स फार्मास्युटिकल्सलाही दिलासा दिला. शसरकारी अधिसूचनेवर २१ मार्चपर्यंत बंदीही घातली आहे. सोमवारी फायझरने कोरेक्स आणि फेंसिडिल या लोकप्रिय कफ सिरपची विक्री थांबवली होती.

हायकोर्टाचा दिलासा
ज्याप्रमाणे फायझरच्या कोरेक्सला दिलासा देण्यात आला, तसाच अबॉट हेल्थकेअर आणि मॅक्लॉड्सलाही देण्यात येत आहे. ही औषधे मागील २० वर्षांपासून बाजारात आहेत. असे काय घडले की अचानक त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे, असा सवाल करत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव सहाय यांनी केंद्राला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले.
६००० औषधे केंद्र सरकारच्या रडारवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालय ६,००० हून अधिक औषधांचे मूल्यांकन करत आहे. त्यापैकी किमान १००० औषधे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन आहेत. येत्या सहा महिन्यांत अशी किमान ५०० औषधे बंद होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...