आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा संसर्ग, मृतांची संख्या 585 वर, तीन दिवसांत 100 वर मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वाइनफ्लू रोग देशभरात पसरत चालला असून गेल्या वर्षभरात या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीनच दिवसांत देशभरात १०० मृत्यूंची नोंद झाली आहे.
फेब्रुवारीमध्ये अिधक वेगाने या राेगाचा संसर्ग वाढत गेला. १२ फेब्रुवारीपर्यंत या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४८५ होती. मात्र, नंतरच्या तीनच दिवसांत १०० जणांची यात भरपडली.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ही साथ वेगाने पसरत चालली असून रविवारी एकाच दिवसात राजस्थानमध्ये बारा जणांचा बळी गेला. याच दिवशी मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी आठ जणांना या रोगाची लागण झाल्याचे निदान झाले. दिल्ली आणि तामिळनाडूमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांत थैमान घातले असून मुंबईसह पुणे, औरंगाबाद विदर्भाच्या काही भागांतही या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. मृतांचा आकडाही ४० च्या वर गेला आहे.

12 रुग्णांचा राजस्थानात रविवारी गेला बळी
८४२३ लोकांना चालू वर्षात लागण झाली.

केंद्र सरकारची पथके
दिल्लीतामिळनाडूत स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक आरोग्य यंत्रणांना चांगले यश आले आहे. मात्र, इतर राज्यांत हा रोग पसरत चालला असल्याने आता केंद्राची आरोग्य पथके संबंधित राज्यांत पाठवण्यात आली आहेत. याशिवाय पुरेसा औषधांचा साठा मनुष्यबहळही सज्ज ठेवण्यात आले आहे.