आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Then Hundted Indians Under Lens For Following IS Propaganda

150 भारतीय करताहेत ISIS ला फॉलो, गुप्‍तचर यंत्रणांनी ठेवली निगराणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि आसाम ही पाच राज्ये इस्लामिक स्टेट (इसिस)या दहशतवाद संघटनेच्या रडारवर आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारकडून या राज्‍यांना खबरदारीच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. दरम्‍यान, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झालेल्‍या 150 भारतीय नागरिकांच्‍या हालचालींवर भारतीय सुरक्षा संस्था लक्ष ठेवून आहेत. या 150 व्‍यक्‍ती सोशल मीडियावर आयएसआएसला फॉलो करतात. मात्र, त्‍यांना सध्‍या तरी अटक केली जाणार नाही.
दक्षिण भारतातील युवकांची संख्‍या अधिक
आयएसआयएसकडे आकर्षित झालेल्‍या या 150 व्‍यक्‍तींमध्‍ये बहुतांश युवक हे दक्षिण भारतातील आहेत, असा दावा गुप्‍तचर संस्थांनी केला आहे. त्‍यांनी आयएसआएसमध्‍ये दाखल होऊ नये, यासाठी त्‍यांच्‍यावर लक्ष ठेवले गेले आहे.
कुटुंबीयांना माहिती देणार
ज्‍या व्‍यक्‍तींवर भारतीय गुप्‍तचर यंत्रणा लक्ष ठेवून त्‍यांच्‍या कुटुंबीयांना या विषयी माहिती दिली जाणार आहे. दरम्‍यान, त्‍यांनी काही गैरकृत्‍य करू नये, यासाठी त्‍यांचे समुपदेशनही केले जाणार आहे.
23 भारतीय आयएसआयएसमध्ये सामील
आतापर्यंत 23 भारतीय आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी इराक-सिरियात गेलेले आहेत. त्यांपैकी सहा जण मारले गेले असून, एक जण मुंबईत परत आला आहे. तर आयएसआयएसमध्ये सामील होण्याच्या उद्देशाने निघालेल्या अन्य 30 भारतीयांना मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये जाण्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे.