आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात इंटरनेट वापरात महिलांचे प्रमाण अधिक, ‘इंटरनेट इन इंडिया’ अहवालातील आकडेवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील महानगर व मोठ्या शहरांतील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढत आहे. २०१४ मध्ये या वाढीचा दर ३० टक्के असल्याचे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आयएएमएआय) अहवालात म्हटले आहे. ‘इंटरनेट इन इंडिया’ या अहवालात ही आकडेवारी जाहीर केली आहे.

२०१३ मध्ये इंटरनेट वापरणाऱ्या महिलांची संख्या १६ दशलक्ष होती. २०१४ मध्ये २०.७७ दशलक्ष महिला ऑनलाइन झाल्या आहेत. भारताच्या शहरी भागातील इंटरनेट वापरणा-या पुरुषांच्या संख्येत यंदा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा सर्व्हे देशाच्या ३५ शहरांतून करण्यात आला. महिलांचा इंटरनेटकडे असणारा कल पाहता काही वर्षांत यात पुरुष व महिलांची संख्या समान होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. जून २०१४ पर्यंत देशात एकूण इंटरनेट वापरकर्ते २४३ दशलक्ष होते. इंटरनेट वापराच्या वाढीचा दर सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अाहे. यात ६२ टक्के दराने वाढ दिसून आली आहे. २०१३ मध्ये ४.५१ दशलक्ष विद्यार्थ्यांची संख्या सध्या ७.२९ पर्यंत गेली आहे. शहरी भागातील शालेय विद्यार्थिनींच्या संख्येत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २.१५ वरून ही संख्या आता २.८८ दशलक्ष झाली आहे.

गृहिणींचा इंटरनेटकडे अधिक कल
याशिवाय गृहिणींच्या इंटरनेट वापरात १८ टक्क्यांनी वाढ झाली असून ही संख्या ५.८३ दशलक्ष आहे, तर कामकरी महिलांच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ दिसून आली असून ही संख्या ४.७७ दशलक्षांपर्यंत गेली आहे. गृहिणींमध्ये इंटरनेट वापराचा दर अधिक अाहे, हे विशेष तथ्य या अहवालाने समोर आले आहे. महानगरांमध्ये एकूण संख्येच्या ६० टक्के कामकरी महिला व ४७ टक्के गृहिणी दररोज इंटरनेटचा वापर करत असल्याचे या अध्ययनात
स्पष्ट झाले अाहे.