आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तच्या विकासासाठी मुर्सींनी मागितली भारताकडे मदत- विविध सात करारांवर स्वाक्ष-या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इजिप्तचे राष्ट्रपती मुहंमद मुर्सी यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी भारताकडून मदत मागितली आहे. भारतीय उद्योगपतींसाठी इजिप्तमध्ये गुंतवणुकीच्या मुबलक संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुर्सी यांचे सोमवारी रात्री उशिरा तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आगमन झाले.

आपल्या दौ-याच्या प्रारंभीच अलिप्त राष्ट्र चळवळीतील भारत आणि इजिप्तच्या सहकार्याचे स्मरण केले. उभय देशांदरम्यान मंगळवारी सात द्विपक्षीय करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. त्यात माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, लघु उद्योग विकास, सांस्कृतिक वारशांचे जतन आणि अंतराळात उपग्रह पाठवण्याबाबतच्या कराराचा समावेश आहे. इजिप्तमध्ये लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रपतींचे स्वागत करताना मला अत्यानंद होत आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. मुर्सी यांच्याबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुर्सी यांनी इजिप्तमधील लोकक्रांतीमध्ये योगदान दिल्याबद्दल भारतीय जनता आणि सरकारचे आभार मानले आहेत.