आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mossad, MI5 To Shield Prime Minister Narendra Modi In Turkey

तुर्कीमध्ये मोसाद, एमआय-5 सारख्या विदेशी यंत्रणा करणार मोदींची सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जी-20 परिषदेसाठी तुर्कीला पोहोचलेल्या पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात आला आहे. तुर्कीच्या अंकारा आणि अंताल्या शहरांमध्ये मोदींच्या सुरक्षेसाठी इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि ब्रिटनच्या एमआय-5 या दोन संस्थांचे एजंट्स तैनात असणार आहेत. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानूसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनआयएस) अजीत डोभाल यांनी हा प्लॅन तयार केला आहे.
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये 10 ऑक्टोबर रोजी दोन स्फोट झाले होते. त्यात 102 लोक मारले गेले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्र फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठे दहशतवादी हल्ले झाले. या घटनानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोदींच्या सुरक्षेत वाढकरण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनूसार हल्ल्याच्या स्थितीत पंतप्रधानांना कसे सुरक्षित बाहेर काढता येईल, आपातकालिन स्थितीत काय करावे लागेल, याची तयारी करण्यात आली आहे.

मोदींच्या संरक्षणात विदेशी चेहरे
>> अशी माहिती आहे, की काही विदेशी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी तुर्कीला पोहोचले आहेत. त्यांच्याबद्दल मिळालेल्या माहितीनूसार त्यातील काही इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि काही ब्रिटनच्या एमआय-5 चे एजंट्स आहे.
>> हे विदेशी एजट्ंस भारतीय सुरक्षा रक्षकांसोबत मोदींच्या संरक्षणात असतील.
>> भारतीय सुरक्षा यंत्रणेचे (एसपीजी, रॉ, आयबी) अधिकारी आणि कर्मचारी आधीच तिथे पोहोचले आहेत.
>> सूत्रांच्या माहितीनूसार मोदींच्या सुरक्षेसाठी जवळपास 1000 स्वदेशी आणि विदेशी एजंट्स तैनात आहेत.
>> विशेष म्हणजे हे सर्व एजंट्स एका स्पेशल कमांड सेंटर्सद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहतिल.

काय आहे धोका
शक्यता आहे की दहशतवादी हवाई हल्ला किंवा समोरा-समोर हल्ला करुन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करतील. तुर्कीमध्ये जी-20 परिषदेसाठी विविध देशांच्या प्रमुखांसह जवळपास 12 हजार लोक सहभागी होणार आहेत. काही अनुचित घटना घडली तर पंतप्रधान मोदींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दुसरा प्लॅन तयार ठेवण्यात आला आहे. यात अत्याधूनिक रडार आणि कम्युनिकेशन यंत्रणा आहे.