आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशद्रोहाची सर्वाधिक प्रकरणे बिहारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशद्रोहाची सर्वाधिक प्रकरणे बिहारमध्ये दाखल करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली.
देशद्रोहाचा खटला सुरू असलेला जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारही बिहारमधीलच आहे. रिजिजू यांनी सांगितले की, बिहारमध्ये दाखल १६ प्रकरणांत २८ जणांना अटक करण्यात आली आहे. पूरक प्रश्नांच्या उत्तराते ते म्हणाले की, सरकारी आकड्यांनुसार बिहारनंतर झारखंड, केरळ आणि ओडिशाचा क्रमांक लागतो. अनेक सदस्यांनी देशद्रोहाशी संबंधित १२४ (अ) कलम हटवण्याची मागणी केली.