आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक नकली नाेटा दिल्ली व महाराष्ट्रात! 3 वर्षांत 100 काेटींच्या नकली नाेटा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : देशातील नकली नाेटांना संपवण्यासाठी १००० अाणि ५०० रुपयांवर बंदी घालण्यात अाली अाहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक नकली नाेटा या दिल्ली अाणि महाराष्ट्रात जप्त करण्यात अाल्या अाहेत. महाराष्ट्रात यासाठी ५६८ गुन्हे नाेंदविण्यात अालेले अाहेत.
वित्त मंत्रालयाच्या नाेंदीनुसार २०१३, २०१४ अाणि २०१५ या तीन वर्षांत देशभरातून १०९.५ काेटी रुपयांच्या नकली नाेटा जप्त करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. त्यात दिल्लीमध्ये २८.७६ काेटी रु., महाराष्ट्रात १३.५० काेटी रुपये जप्त केल्या गेले. दिल्लीत सर्वाधिक नकली नाेटा पकडण्यात अाल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या तुलनेत गुन्हे नाेंदविण्याची संख्या कमी अाहे. दिल्लीत केवळ १९९ प्राथमिक गुन्ह्यांची नाेंद झाली अाहे.
महाराष्ट्रापाठाेपाठ उत्तर प्रदेशात ९.१८ काेटी, गुजरातमध्ये ९.१३ काेटी, तामिलनाडू ९.६ काेटी रुपये जप्त करण्यात अालेत. २०१३ मध्ये ४२.९० काेटी रुपये, २०१४ मध्ये ३६.११ काेटी अाणि २०१५ मध्ये ३०.४३ काेटी रुपयांच्या नकली नाेटा जप्त केल्या गेल्यात. नकली नाेटांमध्ये १००० अाणि ५०० रुपयांची संख्या अधिक हाेती.
२०१३ मध्ये ८ लाख ४६ हजार ९६६, २०१४ मध्ये ७ लाख ९ हजार ५५१ अाणि २०१५ मध्ये ६ लाख ३२ हजार ५१७ जप्त केलेल्या नाेटांची संख्या हाेती. दरम्यान, केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी टीका केली. परंतु नकली नोटांची समांतर अर्थव्यवस्था नष्ट होईल, असा दावा सरकारकडून करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...