आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अंतराळ यात्रा ठरल्या अपयशी, अनेक देशांना बसला होता धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंतराळ यात्रा या सर्वाधिक खर्चीक आणि हायप्रोफाइल असल्यामुळे नेहमीच चर्चेत राहातात. याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. नासाच्या माहितीनुसार, स्पेस शटल मिशनला साधाराण 45 कोटी डॉलर खर्च येतो. तर, स्पेस डॉटकॉम नुसार 1 अब्ज 60 कोटी रुपये खर्च होतात. हा खर्च ऐवढ्यावरच थांबत नाही, यात उशिर झाला किंवा काही चूक झाली तर, खर्च कित्येक पटीने वाढतो. अमेरिकेत शटल मिशनमध्ये उशिर झाला तर, प्रत्येक दिवशी 13 लाख रुपये खर्च येतो.
गेल्या 40 वर्षांमध्ये अंतराळातील शोधासाठी अनेक अंतराळ यान, रॉकेट, उपग्रह, टेलिस्कोप आणि रोव्हर लॉन्च अपयशी ठरले आहेत. या मोहिमांवर कित्येक कोटी रुपये खर्च झाले होते. येथे आम्ही अशाच काही अयशस्वी अंतराळ अभियांनांबद्दल सांगणार आहोत.
स्पेस शटल कोलंबिया (2003)
खर्च 793 अब्ज रुपये
16 दिवसांनंतर मोहिमेवरुन परतत असताना 1 फेब्रुवारी 2003 रोजी पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करत असताना स्पेस शटल कोलंबिया नष्ट झाले होते. यात असलेल्या 7 आंतरिक्ष यांत्रींचा त्यात मृत्यू झाला होता. यात भारतीय वंशाची कल्पना चावला होती.

(कोलंबिया दुर्घटनाग्रस्त झाले तेव्हाचे छायाचित्र)