आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Most Of The Parts In Country Receives Heavy Rainfall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारगिलमध्‍ये ढगफुटी, महाराष्‍ट्रात पूर; जायकवाडीचा पाणीसाठा वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सध्‍या अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. काश्मिरपासून कन्‍याकुमारीपर्यंत सर्वदूर पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी अतिवृष्‍टीमुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. गुरुवारी रात्री कारगिल आणि आसपासच्या भागात ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला आहे. या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पूराच्या पाण्‍यात वाहून गेले आहेत. श्रीनगर-कारगिल महामार्गाचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

महाराष्‍ट्रातही अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरात पाणी शिरले आहे. इरई आणि झरपट नदीच्‍या पुरामुळे शहराचा तलाव झाला आहे. अनेक भागांमध्‍ये कमरेपर्यंत पाणी आहे. त्‍यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे हलविण्‍यासाठी लाईफबोटीचा वापर करण्‍यात येत आहे. सरकारी कार्यालये आणि शाळांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे.

गुरूवारी रात्री कारगिल परिसरात ढगफुटी झाली. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणचे मोबाईल टॉवर्सही वाहून गेले. त्‍यामुळे संपर्क यंत्रणा कोलमडली. श्रीनगर-कारगिल-द्रास महामार्ग ठिकठिकाणी वाहून गेला आहे. त्‍यामुळे अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहे. अनेक घरामध्ये पूराचे पाणी शिरले असून वस्त्यामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ढगफुटीचा फटका बसलेल्या भागात लष्कराच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.