(मोतीलाला व्होरा संग्रहित छायाचित्र)
नवी दिल्ली - काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांच्या नावावर दिल्लीमध्ये तब्बल नऊ सरकारी बंगले मंजूर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना नियमानुसार लोधी इस्टेट याठिकाणी बंगला मंजूर करण्यात आलेला होता.
युपीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या मंत्र्यांचे बंगले रिकामे करण्याच्या प्रक्रियेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. व्होरा यांच्याकडे तब्बल 8 अतिरिक्त बंगले असल्याचे आढळले आहे. व्होरा यांच्याकडे व्हीव्हीआयपी नॉर्थ अॅव्हेन्यू येथे बंगला क्रमांक 49,63, 78 आणि 112 हे बंगले आहेत. तर साऊथ अॅव्हेन्यू येथे 49 आणि 139 हे बंगले आहेत. 79 साऊथ अॅव्हेन्यू या बंगल्याची सध्या दुरुस्ती सुरू आहे.
राज्यसभा सदस्य म्हणून व्होरा यांना एक बंगला मिळतो. तसेच पाहुण्यांसाठी ते व्हीपी हाऊस येथे फ्लॅट क्रमांक 507 ची मागणी करू शकतात. सरकारी निवसांचा वापर करण्यासाठी असलेले नियम कठोरपणे पाळले जावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक दिवसांपासून आग्रही आहेत. हे बंगले परत मिळवण्याचे अत्यंत कठीण असे काम नगरविकास मंत्रालयाला करावे लागत आहे.
पुढे वाचा - पृथ्वीराज चव्हाणांसह तीन मुख्यमंत्र्यांकडे दिल्लीतील बंगले