आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलकरीण हत्या, बसपा खासदाराचा जामीन फेटाळला, दिल्ली न्यायालयाकडून पत्नीलाही दिलासा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-मोलकरीण हत्या प्रकरणात बसपा खासदार धनंजय सिंग आणि पत्नी जागृती सिंग यांना दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन फेटाळला. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.जौनपूरचे खासदार असलेल्या धनंजय सिंग यांचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश लोकेश कुमार शर्मा यांनी जामीन फेटाळून लावला. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता सिंग यांच्यामध्ये आहे. त्यामुळे तसे होऊ नये म्हणून जामीन नाकारण्यात येत असल्याचे कोर्टाने सांगितले. शनिवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती न्यायालयात दिली. वास्तविक शनिवारी धनंजय आणि पत्नी जागृती यांच्यावरील आरोपपत्रावर सुनावणी होणार होती. आता पुढील सुनावणी 21 मार्चला होणार आहे. धनंजय यांच्याकडून वकील एस.पी.एम त्रिपाठी यांनी काम केले. जागृतीवर हत्या, हत्येचा प्रयत्न या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धनंजय आणि जागृती यांना गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 35 वर्षीय राखी भद्रा या मोलकरणीच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मृत राखी मूळची पश्चिम बंगालमधील आहे. धनंजय आणि जागृती दोघेही शासकीय रुग्णालयात दंतशल्यचिकित्सक आहेत. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.