आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी केंद्रीय मंत्री अहमद यांचे हृदयविकाराने निधन, उद्या बंद राहणार सभागृहाचे कामकाज-सुमित्रा महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री व आखाती देशांत भारताचे दूत म्हणून ओळख असलेले ई. अहमद यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. मंगळवारी संसदेत राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. इंडियन मुस्लिम लीगचे ते नेते होते. यूपीए सरकारमध्ये अहमद परराष्ट्र राज्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अहमद यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, मंगळवारी अहमद यांच्या कुटुंबीयांना प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेऊ दिली नसल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर होत आहे.
 
काँग्रेसने केली होती कामकाज स्थगित करण्याची मागणी
साधारणपणे विद्यमान खासदाराचे निधन झाल्यास सभागृहाचे कामकाज एका दिवसासाठी स्थगित केले जाते. त्यामुळे अहमद यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कामकाज स्थगित करण्याची मागणीही केली होती. केंद्रीय अर्थसंकल्प आजच सादर होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.  
 
सोनिया-राहुलने रात्री उशीरा घेतली भेट 
- दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात अहमद यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. 
- त्यापूर्वी मंगळवारी रात्री उशीरा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी अहमद यांना भेटण्यासाठी राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले होते. 
- यादरम्यान, त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष राहुल गांधी, अहमद पटेल आणि गुलाम नबी आझादही होते. 
- रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही नेत्याला अहमद यांची भेट घेऊ दिली नाही. 

कुटुंबाने रुग्णालयावर लावले आरोप.. 
- हार्ट अटॅकनंतर अहमद यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. 
- रुग्णालय प्रशासनाने कोणालाही अहमद यांची भेट घेऊ दिली नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
- अहमद यांचा मुलगा म्हणाला, ते माझे वडील असूनही मला त्यांच्याशी भेटू दिले नाही. त्यांना भेटणे हा माझ्या अधिकार आहे. 

10 वर्ष होते परराष्ट्र राज्यमंत्री 
- 78 वर्षीय अहमद हे इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे खासदार होते. ते केरळच्या मलाप्पुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. 
- अहमद युपीए-1 आणि यूपीए-2 च्या सरकारदरम्यान 10 वर्षे परराष्ट्र राज्यमंत्री होते. 
- संसदेत बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर टेवण्यात आले होते. 
- नरेंद्र मोदींनीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...