आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे खासदारांचा 'याराना', सभागृहाबाहेर असे भेटतात विरोधक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आप खासदार भगवंत मान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया एकमेकांना भेटताना. - Divya Marathi
आप खासदार भगवंत मान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया एकमेकांना भेटताना.
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळा, ललितगेट प्रकरणावरुन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यावर विरोधक अडून आहे. संसद पहिल्या दिवसापासून ठप्प आहे. ना काँग्रेस मागे हटायला तरा आहे, ना भाजप. सभागृहात जरी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर हल्ला करत असले तरी, सभागृहाबाहेर भाजप आणि काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असलेले दिसतात.

आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिय सुळे संसदेबाहेर गप्पात रंगलेले दिसले. तर, भाजप नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि आपचे भगवंत मान हास्य विनोदात रंगलेले होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जून खरगे देखील एकमेकांशी चर्चा करताना दिसले.

शशि थरुर यांना अशोक गजपतिंनी केला सॅल्यूट
पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळोवेळी स्तुती करणारे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी ऑक्सफोर्डमध्ये दिलेल्या भाषणाचे मोदींनी कौतूक केले आहे. त्यांचे भाषण हे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असल्याचे मोदी म्हणाले. शुक्रवारी थरुर संसद परिसरात दिसल्यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपतिंनी त्यांना सॅल्यूट ठोकला आणि त्यांचे अभिनंदन केले. सभागृहाबाहेर एकमेकांशी एवढ्या खेळीमेळीने राहाणारे सदस्य सभागृहातही जर असेच वागले तर जनतेच्या कोट्यवधी रुपयांची नासाडी होणार नाही.
चार मिनीटात लोकसभा स्थगित
शुक्रवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरु झाले आणि सदस्यांच्या गदारोळामुळे चारच मिनिटांमध्ये कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. राज्यसभेचे कामकाज सकाळी 11, दुपारी 12 आणि नंतर 2.30 वाजता चालल, मात्र नतंर सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, खासदांराच्या मैत्रीचे फोटोज्...