आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींसाठी अजून \'दिल्ली\' दूर; खासदार शत्रुघ्न सिन्हांकडून घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान पदासाठी भारतीय जनता पक्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांची केंद्रीय प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली असताना मोदींसाठी अजून 'दिल्ली' दूर असल्याची टीका खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
शत्रुघ्न सिन्हा एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बिहारमधील भाजपच्या आमदारांनी पक्षाविरोधात बंड फुकारले असताना बॉलिवूडमध्ये 'शॉटगन' म्हणून प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी टीमला 'लॉलीपॉप' म्हटले आहे. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियताही केवळ मीडिया आणि पक्षामुळेच असल्याचीही टीका सिन्हा यांनी केली आहे.

सिन्हा म्हणाले, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. लालकृष्ण आडवाणी हे पक्षातील अनुभवी नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. पक्षातील ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर मुरली मनोहर जोशी आणि अरूण जेटली यांनाही विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप सिन्हा यांनी यावेळी केला.