आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसने कॉलेजला जात होत्या EX CM कन्या, बाळासाहेब ठाकरेंच्या भाच्यासोबत केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. महाराष्ट्राची नस ओळखणारे आणि राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांच्‍या त्या कन्‍या आहेत. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रियांनी स्‍वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्‍यांचे वडील शरदराव मुख्‍यमंत्री असतानाही त्‍या एसटी बसनेच कॉलेजमध्‍ये ये-जा करत. त्यानंतर पुण्‍यातून प्रकाशित होणा-या एका अग्रगण्‍य दैनिकात त्‍यांनी काही काळ नोकरीही केली. दरम्‍यान, त्‍यांची आणि सदानंद सुळे यांची ओळख झाली. पुढे दोघे लग्‍नाच्‍या बेडीत अडकले. सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या संदर्भात फार समोर न आलेली माहिती आपल्यासाठी घेऊन आलोय. सुप्रियाताई आणि सदानंद यांची पहिली भेट कुठे झाली, ताईंचे कॉलेज जीवन कसे होते, याची रंजक माहिती....
असे गेले ताईंचे बालपण
शरदरावांचे प्रतिभाताईंशी ज्‍या वेळी लग्‍न ठरले त्‍यावेळी त्‍यांनी एकच अट घातली होती. ती म्‍हणजे, आपल्याला एकाच मूलं हवं. मग ते मुलगा असो की मुलगी. 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रिताईंचा जन्म झाला. त्‍या एकुलती एक मुलगी आहे, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तब्बल 44 वर्षापूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता. त्यातून दोघांच्या आधुनिक विचारांमधील परिपक्वता अधोरेखित होते. अशा उच्‍च विचारांच्‍या कुटुंबात सुप्रिताईंची जडणघडण झाली. त्‍यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकलं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे, अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्‍यांच्‍या आयुष्याचे सगळे निर्णय त्‍यांनीच घेतले आणि विशेष म्हणजे त्‍यांचे आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- कॉजेलमध्‍ये होत्‍या खूप लाजाळू, मुख्‍यमंत्र्यांची मुलगी असूनसुद्धा बसने करत ये-जा...
- सदानंदरावांशी कशी झाली ओळख..?
- बाळासाहेब ठाकरेंच्‍या आहेत भाचेसून...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...