आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत घोषणाबाजी करताना बेशुद्ध झाल्या डीएमकेच्या खासदारI

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डीएमकेच्या पाच मंत्र्यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामे सादर केले. त्यात अलागिरी, डी.नेपोलियन, एसएस पलानिमणिक्कम, गांडिसेल्वम आणि एस. जगतरक्षन यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, राज्यसभेत तामिळांवर होणार्‍या अत्याचाराच्या मुद्दय़ावरुन घोषणाबाजी करणारे डीएमकेचे खासदार वसंथी स्टेनले हे बेशुद्ध झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डीएमकेने सरकारचे समर्थन काढून घेतल्यानंतर समाजवादी पक्षाने यूपीए सरकारला ब्लॅकमेल करणे सुरु केले आहे. पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंग यांनी केंदीय उद्योग मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दहशतवाद्यांना ते मदत करत असल्याचाही आरोप मुलायम सिंगांनी वर्मांवर केला आहे.