आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांना कॅन्टीनचे जेवण हवे 'आम'दरात ! 75 रुपयांची दाळ हवी 3 रुपयांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या उपहारगृहात मिळणार्‍या भोजनाने खासदार संतुष्ट नाहीत. काही दिवसांपूर्वीच खासदार जया बच्चन यांनी संसदेच्या उपहारगृहावर राग व्यक्त केला होता. त्यानंतर नॉर्दन रेल्वे केटरिंगकडून या उपहारगृहाचा कंत्राट काढून आऊटसोर्स करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी आयटीसी, एमटीआर आणि हल्दीराम यासारख्या कंपन्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांनी सांगितलले दर ऐकून सचिवालयाच्या अधिकार्‍यांचे डोळे पांढरे झाले.
अन्न पदार्थांच्या किंमती, मेन्यू आणि इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी आज (बुधवार) रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लोकसभेच्या सेक्रेटरी जनरलची भेट घेतली. त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले, 'खासगी कंपन्यांचे दर ऐकून संसदेचे अधिकारी आश्चर्यचकित झाले. सध्या संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना 3 रुपये दराने दाळ मिळते. हल्दीरामने त्याचा दर 50 रुपये, एमटीआरने 60 रुपये आणि आयटीसीने 75 रुपये सांगितला. तर, मटर पनीर साठी याच कंपन्यांनी अनुक्रमे 60, 75 आणि 80 रुपये दर राहातील असे सांगितले.'
या कंपन्यांचे म्हणणे आहे, की या पेक्षा कमी दर करु शकत नाही. त्यामुळे ही बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय संपली. रेल्वेचे अधिकार म्हणाले, संसदेचे अधिकारी दर वाढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. याआधी 2010 मध्ये कॅन्टीनच्या दरांमध्ये वाढ केली गेली तेव्हा देखील खासदार त्याविरोधात असल्याचे संसदेच्या एका अधिकार्‍याने सांगितले.
संसदेच्या कॅन्टीन मेन्यू कार्डची झलक
ब्रेडसह टोमॅटो सुप - 8 रुपये.
फ्राइड फिश ऑफ चिप्स - 25रुपये.
चिकन सँडविच - 6 रुपये.
फ्रुट ज्यूस - 14 रुपये.
फ्रुट सलाद - 14 रुपये.
हलवा - 12 रुपये.