आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MPs Should Speak Carefully, Behave Fairly PM Modi

खासदारांनी तोंड सांभाळून बोलावे, वागणूक व्यवस्थित ठेवावी - पंतप्रधान मोदींनी सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पक्षातील खासदारांच्या वक्तव्यावरून नाराज आहेत. पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ती प्रकट झाली. खासदारांनी तोंड सांभाळून बोलावे तसेच वागणूक व्यवस्थित ठेवावी. कोणालाही लक्ष्मणरेषा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार नाही, या शब्दांत मोदी यांनी सुनावले.

पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान म्हणाले, अनावश्यक वक्तव्यांमुळे सरकार व पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे विरोधकांना एकत्र येण्याचे आयते कोलीत मिळते.
विरोधी पक्ष या संधीचा फायदा
उठवत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा विधानांमुळे सरकारचा विकास अजेंडा मागे राहत आहे.

सल्ला कशामुळे
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि खासदार साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या धर्मांतराच्या विधानाचा विरोधकांनी शस्त्र म्हणून वापर केला. यामुळे मंगळवारी राज्यसभेतील कामकाज विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी खासदारांना सल्ला दिला आहे. त्यांनी याआधीही खासदारांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता.