आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेस्ले मॅगी नूडल्स कंपनीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा, माधुरी-प्रिती-अमिताभविरोधात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिच ती जाहिरात ज्यावरुन माधुरी दीक्षितला नोटीस बजावण्यात आली - Divya Marathi
हिच ती जाहिरात ज्यावरुन माधुरी दीक्षितला नोटीस बजावण्यात आली
नवी दिल्ली - नेस्ले इंडिया आणि इतर पाच जणांवर उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (UPFDA) गुन्हा दाखल केला आहे. बाराबंकीचे फूड ऑफिसर व्ही.के.पांडे यांनी बाराबंकी येथील एका कोर्टात अन्न आणि सुरक्षा कायदा 2006 च्या कलम 58 आमि 59 नूसार तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, शनिवारी बाराबंकीच्या सीजीएम कोर्टात एका वकीलाने मॅगी नुडल्सची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि माधुरी दीक्षित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिक दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण
नेस्लेच्या जगप्रसिद्ध ‘मॅगी’ या नूडल ब्रँडमध्ये शिसे आणि एमएसजी हे टेस्ट एनहान्सर निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आढळल्याच्या प्रकरणाची ‘गंभीर दखल’ सरकारने घेतली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. बाराबंकी जिल्ह्यात मॅगीचे विविध ठिकाणांहून 12 सँपल घेण्यात आले होते. केंद्र सरकारने ते कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात शिसे आणि मोनोसोडियम ग्लूटोमॅटचे (एमएसजी) प्रमाण गंभीर असल्याच अहवाल मिळाला असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे जनरल डी.जी. श्रीवास्तव यांनी सांगितले.
सात वर्षांच्या शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड
कलम 58 नूसार मानकांचे उल्लंघन केल्यास दोन लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तर असुरक्षीत अन्न यासाठी कलम 59 नूसार कारवाई केली जाते. यात दोषी अढळल्यास जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
गुन्हा कोणाविरुद्ध
बाराबंकीचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी पांडे यांनी दिलेल्या माहितीनूसार, न्यू दिल्ली ईझीडे, नेस्ले इंडिया प्रायव्हेट लिमीटेड आणि ऊना (हिमाचल प्रदेश) येथील कंपनीचे कार्यालय, ईझीडेचे परवानाधारक साहब आलम आणि इझीडे चे व्यवस्थापक मोहन गुप्ता यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्ट या सर्वांना सोमवारी नोटीस पाठवणार आहे.