आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएसएमईसाठी नगदीची मर्यादा २ लाख करण्याची मागणी : एमएसएमई मंत्रालय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर छोट्या व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमएसएमई मंत्रालयाच्या वतीने लघु आणि छोट्या उद्योजकांसाठी आठवड्याला बँकेतून नगदी पैसे काढण्याची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत करण्याची मागणी करणार आहे. सध्या ही मर्यादा ५०,००० रुपये आहे. एमएसएमई राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांनी असोचेमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ही माहिती दिली.


मंत्रालय सध्या एमएसएमई संघटनांशी चर्चा करत आहे. त्यांच्या मागण्या लवकरच अर्थ मंत्रालयासमोर ठेवण्यात येणार आहेत. असे असले तरी उद्योजकांनी जास्तीत जास्त व्यवहार हा डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सरकारची भांडवली तूट कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालय सध्या ई-काॅमर्सची मदत घेत असून इंटरनेट आणि मार्केटिंगच्या माध्यमांचा वापर करत असल्याचे चौधरी म्हणाले. यावरूनच कोणत्या उत्पादनाची मागणी जास्त आहे, याची माहिती मिळते. ई-कॉमर्सच्या मदतीमुळे छोटे उद्योजक आपला नफा वाढवू शकतात. त्यांनी सांगितले की, ९२ टक्के शेतकरी आपल्यावरील कर्ज परत करतात. कंपन्यांची तुलना केली तर ही टक्केवारी सरासरीपेक्षाही जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकांच्या शाखा कमी
बँकांच्या शाखा कमी असल्यामुळेच लघु उद्योजकांना जास्तीत जास्त व्यवहार नगदीने करावे लागत असल्याचे मत असोचेमच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यवसाय जेवढा छोटा असेल, त्यासमोरील समस्या तेवढ्या जास्त असतात. अनेक ग्रामीण भागांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत. जेथे आहेत, तेथे त्या आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सुरू असतात. येथे काम करणारे लाेक येथील पोस्टिंगला शिक्षा समजतात. काही अडचणींकडे इतकेही दुर्लक्ष करू नये की, ते प्रणालीच्या विरोधात जातील. जीएसटीचे अनेक फायदे असले तरी यामुळे एमएसएमईची गुंतवणूक वाढण्याची भीती असल्याचेही मत या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...