आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु उद्योग सरकारी लाभापासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एमएसएमई क्षेत्रात ९४ टक्के लघु उद्योजकांचा समावेश आहे. यामधील अनेक उद्योग नोंदणीकृतही नाहीत. यामुळे अशा उद्योगांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, असे मत लघु आणि सूक्ष्म उद्योग विकास परिषदेचे अध्यक्ष रजनीश गोयंका यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. २०२० पर्यंत एमएसएमईसोबत १० लाख सूक्ष्म उद्योगांना नोंदणीकृत करण्याचा उद्देश ठरवण्यात आला आहे. लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि चेंबर ऑफ पीएचडीसोबत परिषदेच्या वतीने २८ ते ३० ऑगस्टदरम्यान दुसऱ्या "इंडिया एमएसएमई एक्स्पो तथा संमेलन २०१५'चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोयंका यांनी दिली. यात राज्यस्तरीय सरकारी कंपन्या, बँका, व्यावसायिक, बहुराष्ट्रीय कंपन्या, लघु उद्योजक, सेवा देणारे सहभागी होणार आहेत.