आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh Ambani News In Marathi, Billionair, India

मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत; भारतात तब्बल 70 अब्जाधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात 70 अब्जाधीश असून 18 अब्ज डॉलर संपत्तीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत 70 अब्जाधीशांसह भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

चीनमधील हुरून संस्थेने तयार केलेल्या 2014 मधील जागतिक श्रीमंतांच्या यादीत 68 अब्ज डॉलरचे मालक बिल गेट्स पहिल्या स्थानी आहेत. बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट 64 अब्ज डॉलर संपत्तीसह दुस-या, तर इंडिटेक्सचे अमान्सिओ ऑर्टेगा 62 अब्ज डॉलरसह तिस-या स्थानी आहेत. चौथ्या क्रमांकावरील ओरॅकल्सचे लॅरी एलिसनकडे 60 अब्ज डॉलर संपत्ती आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 12 टक्के घसरण झाल्याने अब्जाधीश भारतीयांची कट-ऑफ यादी तयार करणे कठीण बनल्याचे हुरूनने म्हटले. 2013 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 53 होती. त्यात 17 जणांची भर पडून या वर्षी जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि जपानपेक्षाही जास्त सुपर रिच व्यक्ती भारतात आहेत.

जागतिक क्रमवारी 93
एकट्या मुंबईत 33 अब्जाधीश : भारतातील 70 अब्जाधीशांपैकी 33 अब्जाधीश एकट्या मुंबईत राहतात. जगातील अब्जाधीश शहरांच्या यादीत मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, भारतातील टॉप अब्जाधीश..