आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mukesh Singh, Nirbhaya Bus Rapist Said That Girls Outing In The Night Are Responsible For Rape

निर्भयाचा रेपिस्‍ट म्‍हणाला होता, तरुणी रात्री घराबाहेर निघाल्या तर बलात्काराच्या घटना घडणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह. - Divya Marathi
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह.
नवी दिल्‍ली- 'तरुणी रात्री घराबाहेर निघाल्या तर बलात्काराच्या घटना घडणारच. अशावेळी तिच्‍यावर बलात्‍कार झाला तर त्‍यासाठी तीच जबाबदार राहील', हे वक्‍तव्‍य आहे निर्भया गँगरेप प्रकरणातील एका दोषी मुकेश सिंह याचे. या वक्‍तव्‍याद्वारे तुम्‍हाला निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींची नेमकी मानसिकता काय होती, याचा अंदाज आला असेलच.

संपूर्ण देशाला हादरावून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेपमधील दोषींची मानसिकता अभ्‍यासण्‍यासाठी मागील वर्षी 'बीबीसी'ने 'इंडियाज डॉटर' या डॉक्‍युमेंट्रीमध्‍ये या आरोपींना बोलते केले होते.
 
तरुण आणि तरुणी एकसमान नसतात...
- यावेळी मुकेश म्‍हणाला होता, 'तुम्‍ही एका हाताने टाळी वाजवू शकत नाही. कोणतीही सभ्‍य तरुणी रात्री घराबाहेर फिरत नाही. रात्री फिरणाऱ्या तरुणीवर रेप झाला तर यासाठी बलात्कार्‍यांपेक्षा तीच अधिक जबाबदार असेल.'
- ' तरुणी आणि तरुण एकसमान नाहीत. घर सांभाळणे, घरातच राहणे हे तरुणींचे काम आहे. त्‍या रात्री डिस्‍को, बारला कशा काय जाऊ शकतात? अशा तरुशी तोकडे कपडे घालतात आणि अशाच पद्धतीचे काम करत असतात. सध्‍या फक्‍त 20 टक्‍के तरुणी चांगल्‍या आहेत.'

विरोध केला नसता तर जीव गमवावा लागला नसता...
- मुकेश म्‍हणाला होता, ' मी 15-20 मिनिटे गाडी चालवली असेल. त्‍यांनतर बसमधील लाईट्स बंद केली. प्रथम माझ्या भावाने (प्रमुख आरोपी रामसिंह) निर्भयाच्‍या मित्राला मारले. तेव्‍हा ती 'वाचवा-वाचवा' ओरडू लागली. नंतर आम्‍ही तिला मारत मागे घेऊन गेलो. नंतर आम्ही आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला नसता तर वाचली असती. तिने विरोध न करता सर्वकाही होऊ दिले असते तर आम्‍ही फक्‍त तिच्‍या मित्राला मारले असते. नंतर तिला घरापर्यंतही सोडले असते. तिच्‍या मित्रानेही विरोध केला नसता तर आम्‍ही दोघांनाही मारले नसते.'    
      
आईला म्‍हणाली होती, सॉरी मम्‍मी
- निर्भयाच्‍या शेवटच्‍या दिवसांची हकीकत आईने सांगितली आहे. त्‍यांनी सांगितले की, 'आम्‍ही हॉस्पिटलमध्‍ये तिला भेटायला गेलो तेव्‍हा तिने माझा हात हातात घेतला आणि म्‍हणाली, सॉरी मम्‍मी. मी तुला खूप त्रास दिला आहे. आय अॅम सॉरी.'
- शेवटची घरातून निघताना तिने मला, 'बाय मम्‍मी, 2-3 तासांत परत येर्इल', असे म्‍हटले. अजूनही आठवते.
- दिल्‍लीहून सिंगापूरला जाण्‍यापूर्वी त्‍याच रात्री आम्‍ही तिला भेटलो होतो. तेव्‍हा तिच्‍या भावाला ती म्‍हणाली, किती दिवस झाले आहेत. मला घरी घेऊन चला.'
- निर्भयाच्‍या आईने सांगितले की, ती जेवढे दिवस हॉस्पिटलमध्‍ये होती, तिला झोप येत नव्हती. एकदा ती म्‍हणाली, सतत पायाजवळ किंवा आजूबाजूला कोणीतरी असल्‍याचा भास होतो. तेव्‍हा मी तिच्‍या बाजुला बसत आणि तिचा हात हातात घेत. तेव्‍हा कुठे तिला झोप लागत असे.'
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, रेपिस्‍टचा व्हिडिओ आणि निर्भया प्रकरणानंतर किती बदलला देश?

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...