आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukhtar Abbas Naqvi Protests Induction Of \'terrorist Bhatkal\'s Friend\' Sabir Ali In BJP

साबीर अली तर भटकळचा मित्र, उद्या दाऊदही भाजपात असेल : मुख्तार अब्बास नकवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बिहारमध्ये जदयूमधून हकालपट्टी झालेले साबीर अली यांना भाजपने सदस्यत्व देताच पक्षात एकच हलकल्लोळ उडाला. साबीर यांनी शुक्रवारी दुपारी दिल्ली कार्यालयात सदस्यत्व घेतले. सायंकाळी भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, अतिरेकी भटकळच्या मित्राने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. लवकरच पक्षात दाऊदही येईल.

नक्वींच्या नाराजीने पक्ष अवाक् झाला. रामेश्वर चौरसिया म्हणाले, पाटण्याच्या सभेतील स्फोट हा भाजपचाच कट असल्याचे सांगणार्‍याची कशी गळाभेट घ्यावी? संघानेही या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, मोदींची खांडोळी करेन : काँग्रेसच्या उमेदवाराचा फुत्कार