आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukhtar Abbas Naqvi Writes A Blog Against Rahul Gandhi

केंद्रीय मंत्री मुख्‍तार अब्बास नकवी राहुल गांधींना म्हणाले, \'गूंगा गुड्डा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी - Divya Marathi
फाइल फोटो- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी
नवी दिल्ली - मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री मुख्‍तार अब्बास नकवी यांनी कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांना 'गुंगा गुड्डा' असे संबोधले आहे. रविवारी ( ता.नऊ) नकवी यांनी आपल्या ब्लॉगमध्‍ये राहुल यांच्यासह सोनिया गांधींनाही लक्ष्‍य केले. संसदेत सतत गोंधळ घालणा-या कॉंग्रेसवर त्यांनी टीका केली. नकवी लिहितात, की ग्रँड ओल्ड पार्टीचे ब्रँड न्यू लीडर राहुल बाबा यांचा 'नॉनसेन्स से न्यूसेन्स'पर्यंतचा प्रवास हा संसदीय विचार आणि रस्त्याची समज बरीच दूर असल्याचे सांगते. ते राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करित आहेत.
नक्वींच्या ब्लॉग बॉम्बमधील ठळक मुद्दे
- 'तर्कहीन तमाशा' - नकवी लिहितात, संसदेचा गूंगा गुड्डा, रस्त्याचा सूरमा बनवण्‍याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची स्थिती ना घरचा ना बाहेरचा अशी स्थिती झाली आहे. संसदीय लोकशाही पहिल्यांदाच असे घडत आहे, की ग्रँड ओल्ड पार्टीचा ब्रँड न्यू लीडर जमिनीवरील वास्तव समजू शकत नाही.
- सरकार जर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत असेल, तर विरोधी पक्षाला लोकशाहीपध्‍दतीने विरोध करण्‍याचा अधिकार आहे. मात्र ते मुद्द्यांवर आधारित, तर्कसंगत आणि जनतेच्या हिताचे असावे.
- 21 जुलैपासून शुरु झालेले संसदीय मान्सून अधिवेशन कॉंग्रेसच्या गोंधळामुळे व्यवस्थित चालू शकलेले नाही. ते लोकशाहीविरोधी आहे. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्‍यासाठी तयार असूनही कॉंग्रेस विरोधच करित आहे.
- कॉंग्रेसने लोकशाहीच्या मंदिराला गोंधळाचा आखाडा बनवला आहे;
- राज्यसभामध्‍ये कॉंग्रेसने काही घटकपक्षांच्या सहकार्याने आपल्या संख्‍याबळाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे संसदेचे सत्र व्यवस्थित चालू शकलेले नाही.